बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताची B-टीम श्रीलंकेविरूद्ध भिडणार; शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्व सोपवण्याची शक्यता

मुंबई |  आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. त्याआधी सरावासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 5 कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघ तयारीला लागलेला दिसतोय. पण जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असेल त्याच वेळी भारताचा आणखी एक संघ श्रीलंकेविरूद्ध मैदानात उतरणार आहे.

टीम इंडियाची दुसरी म्हणजे B टीम जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे. श्रीलंका विरुद्ध भारत टी 20 आणि वन डे सीरिज खेळवली जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका पहिला सामना 13 जुलैला खेळवला जाणार आहे. 13, 16 आणि 18 जुलै रोजी वन डे सीरिज होणार आहे. त्यानंतर 21, 23 आणि 25 जुलै रोजी टी 20 सीरिज होणार आहे. सर्व सामने कोलंबो इथल्या प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.

भारताचा प्रमुख संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार असल्यानं संघातील प्रमुख खेळाडू व्यस्त आहेत. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात नवीन खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. तर भारतीय संघाचा सलामवीर शिखर धवनला संघाचं नेतृत्व दिलं जाईल, अशी माहिती समोर आली आहे. याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. लवकरच बीसीसीआय याची घोषणा करणार आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा मध्यम फळीचा फलंदाज श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यामुळे तो श्रीलंका दौऱ्यात असेल की नाही याची घोषणा बीसीसीआय करणार आहे. तर भारताच्या बी संघात  पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, नितीश राणा यांसारख्या खेळाडूंना संधी दिली जाण्याची पुर्ण शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

जेव्हा छगन भुजबळ फडणवीसांना फोन करून म्हणतात, ‘आम्हाला मदत करा,आम्ही…’

सकारात्मक बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांच्या खाली

जात पंचायतीचा जाच संपणार कधी?; बहिष्कार टाकल्यानं 7 बहिणींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा

मुळशीतील रासायनिक कंपनीत पुन्हा एकदा आगीचा थरार; आज सकाळी पुन्हा आग भडकली

“मोठया पवारांकडून पत्र चोरत असताना अजित पवारांसोबत भाजपचे कोण कोण लोक होते?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More