बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

करारा जवाब मिलेगा! चीन सीमेवर भारतीय लष्कराने तैनात केल्या बोफोर्स तोफा

नवी दिल्ली | अनेक दिवसांपासून भारत आणि चीन सीमावाद सुरू आहे. कपटी चीनकडून नेहमी भारताविरूद्ध काहीतरी कटकारस्थानं रचलं जातं. भारतीय लष्कराकडून चीनला अनेकवेळा चोख प्रत्युत्तर दिलं गेलं. चीनच्या सीमेजवळ अरूणाचल प्रदेशाजवळ लष्कराने तैनाती वाढवली आहे. अरूणाचल प्रदेशातील एलएसीच्या पुढे असलेल्या भागात बोफोर्स तोफा तैनात करण्यात आल्या आहेत.

भारतीय लष्कराने विमान शाखेमधील एअर फायर पॉवरमध्ये हेरन आय ड्रोन, सशस्त्र हल्ला हेलिकॅप्टर तैनात केले आहेत. आयएएनएस या वृत्तसंस्थेने अहवालात म्हटलं आहे की, लष्कराने एलएसीला लागून असलेल्या भागात स्वदेशी हलके हेलिकॅप्टर ध्रुवचे एक पथक तैनात करण्यात आलं आहे. रूद्र लढाऊ हेलिकॅप्टरच्या पहिल्या स्क्वॉड्रनने कुठल्याही नापाक कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार केले आहेत.

एलएसीच्या भागात असलेली शस्त्रास्त्रे लष्कराच्या कमांडरना आपत्कालीन परिस्थितीत सर्व प्रकारची ऑपरेशन्स करता येतात. चीनच्या वाढत्या आक्रमकतेला सामोरं जाण्यासाठी लष्कराने एलएसीवर मोठ्या प्रमाणात तैनाती वाढवली आहे.पुर्व  क्षेत्रातील कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी देखील लष्कराने तयारी केली आहे.

दरम्यान, पूर्व लडाखमध्येही भारताने एलएसीवरील चीनच्या फसवेगिरीला सामोरे जाण्यासाठी लष्कर तैनात केले आहेत. भारतीय लष्कराने के-9 ऑटोमॅटीक होवित्झर ही तोफ पुर्व लडाखच्या पुढील भागात तैनात केली आहे. ही तोफ सुमारे 50 किमी अंतरावर शत्रुची पोझिशन्स नष्ट करण्यास सक्षम आहे.

थोडक्यात बातम्या- 

तुमचा लॅपटॉप हॅंग होतोय का? मग वाचा ‘या’ भन्नाट टिप्स

सचिन सावंत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात खळबळ

अखेर रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड!

‘…तर केंद्र सरकार विकावं लागेल’; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं इंधन दरवाढीचं कारण

“सत्तेत असला तरी चुकीचं वागू नका, सर्वांना नियम सारखेच आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More