सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; किंमत ऐकून विश्वास बसणार नाही

Electric Vehicle

Electric Vehicle l भारतातील इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) बाजारात मोठी वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक नवीन इलेक्ट्रिक वाहनांचे मॉडेल्स (Models) बाजारात दाखल होत आहेत. ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेता, वाहन उत्पादक कंपन्या आता कमी किमतीत, परवडणाऱ्या दरात इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून देण्यावर भर देत आहेत.

याच पार्श्वभूमीवर, लिगियर मिनी इलेक्ट्रिक कार (Ligier Mini Electric Car) भारतात चाचणी दरम्यान दिसून आली आहे. ही कार युरोपीय मॉडेलवर आधारित असून, दोन आसनी (2-Seater) आहे. लिगियर मिनी इलेक्ट्रिक कार एका पूर्ण चार्जमध्ये (Full Charge) 63 किलोमीटर ते 192 किलोमीटरपर्यंतची रेंज (Range) देऊ शकते. वेगवेगळ्या बॅटरी पॅकच्या (Battery Pack) पर्यायासह ही कार उपलब्ध होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. ही कार भारतात 1 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, तसे झाल्यास, ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरू शकते.

लिगियर मिनी ईव्हीचे बॅटरी पर्याय आणि रेंज :

भारतातील बाजारपेठेत लिगियर मिनी ईव्ही (EV) G.OOD, I.DEAL, E.PIC आणि R.EBEL या चार प्रकारांमध्ये उपलब्ध केली जाऊ शकते. या कारमध्ये 4.14 kWh, 8.2 kWh आणि 12.42 kWh क्षमतेचे तीन बॅटरी पॅक पर्याय मिळण्याची शक्यता आहे.

ही कार अनुक्रमे 63 किलोमीटर, 123 किलोमीटर आणि 192 किलोमीटरपर्यंतची रेंज एका चार्जमध्ये देऊ शकते. असे असले तरी, ही कार भारतात लॉन्च होणार का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. येत्या काळात याबाबत अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.

Electric Vehicle l लिगियर मिनी ईव्हीचे डिझाईन :

लिगियर मिनी इलेक्ट्रिक कार आकाराने लहान असून मोपेड (Moped) डिझाइनमध्ये येण्याची शक्यता आहे. या गाडीची लांबी 2958mm, रुंदी 1499mm आणि उंची 1541mm असण्याची शक्यता आहे. युरोपियन मॉडेलवर (European Model) आधारित या गाडीत फक्त दोन दरवाजे असू शकतात.

या कारमध्ये 12 ते 13 इंची व्हील्स (Wheels) मिळण्याची शक्यता आहे. लिगियर मिनी ईव्हीचे अंतर्गत डिझाइन (Interior Design) स्पोर्टी (Sporty) असण्याची शक्यता आहे. यामध्ये 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (Infotainment System), अॅपल कार प्ले (Apple Car Play) आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट (Android Auto Support), पॉवर स्टीयरिंग (Power Steering), हीट ड्रायव्हर सीटसह ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल (Automatic Climate Control) आणि कॉर्नर एसी व्हेंट्स (Corner AC Vents) यांसारखी वैशिष्ट्ये असू शकतात.

News Title: India’s cheapest electric car? Ligier Mini EV spotted testing

महत्वाच्या बातम्या-

‘या’ लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे मिळणार नाहीत

HERO स्प्लेंडरच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; लवकरच येणार इलेक्ट्रिक स्प्लेंडर

पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम करेल मालामाल; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई

पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर!

सावधान! शनिदेवाकडून ‘या’ राशींच्या कर्मांचा हिशोब, नशीब बदलणार

 

 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .