भारताचा पराभव विराट कोहलीच्या जिव्हारी, ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता
अहमदाबाद | भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध काल खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने आपल्या खिशात घातल्यानंतर भारताची गाडी रुळावर आली की काय? असचं सर्वांना वाटलं होतं. मात्र, तिसऱ्या सामन्यात देखील इंग्लंडने भारताला हरवलं. या पार्श्वभूमीवर पुढील सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन अंतिम 11 खेळाडूंच्या समीकरणात बदल करण्याची शक्यता आहे.
भारताचा सलामीवीर फलंदाज के एल राहूल मागील काही सामने खराब फाॅर्मशी झुंजत आहे. सध्या चालू असलेल्या सामन्यात त्याने अनुक्रमे 1 , 0 , 0 अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला चौथ्या सामन्यात डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या जागेवर संघ व्यवस्थापन राहूल तेवतिया सारखा एखादा अष्टपैलू खेळाडूला संधी देण्याचा विचार करु शकते.
भारतीय संघ हार्दिक पांड्यासह 5 गोलंदाजांना घेऊन खेळत असल्याने बदली गोलंदाजांचा पर्याय उपलब्ध राहत नाही. त्यामुळे हे टाळण्यासाठी राहुलच्या जागी अष्टपैलू खेळाडू संघात येऊ शकतो. असा बदल केल्या गेल्यास युझवेंद्र चहलला देखील डच्चू मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचा लेगस्पिनर युझवेंद्र चहल इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात अपयशी ठरल्याचं दिसत आहे. अशा परिस्थितीत चहलच्या जागी फिरकीपटू अक्षर पटेल किंवा वेगवान गोलंदाज दीपक चहरला संधी मिळू शकते.
दरम्यान, या 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाने 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. या मालिकेत आणखी दोन सामने बाकी असून पुढील सामना 18 मार्चला खेळवण्यात येणार आहे. तर रोहित शर्माचं संघात पुनरागमन झाल्यानं भारतीय संघाची ताकत आणखी वाढली आहे.
थोडक्यात बातम्या –
‘एखाद्या वावटळीत पोलीस दलाची…’; परमबीर सिंग यांच्या बदलीवर संजय राऊतांचं ट्विट
धक्कादायक! मुलाला घेऊन घरी जात होती महिला अन् अचानक कारवर येऊन कोसळलं विमान, पाहा व्हिडीओ
गृहमंत्र्यांची खुर्ची सेफ, मुंबईच्या पोलीस आयुक्तांची मात्र उचलबांगडी
कोरोना लसीवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.