बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तिसऱ्या कसोटीत भारताचा दारूण पराभव; इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज ढेर

मुंबई | लाॅर्ड्सवर भारताने इंग्लंडचा मानहानीकारक पराभव केला होता. त्याचा बदला आता इंग्लंड संघाने घेतला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने एक डाव आणि 76 धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लडंच्या या विजयाबरोबरच आता इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजीची दाणादाण उडलेली पहायला मिळाली.

सर्वप्रथम नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, फलंदाजीला उतरलेला भारतीय संघ केवळ 78 धावांवर गारद झाला. भारताच्या पहिल्या डावात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे वगळता इतर कोणत्याही खेळाडूला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. त्यानंतर इंग्लंडने आक्रमक फलंदाजी करत 432 धावसंख्या उभी केली.

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शतक झळकावलं. त्यानं 121 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावाअखेर 354 धावांची आघाडी घेतली. त्याला प्रत्युत्तर देताना भारताची सुरूवात खराब झाली. सलामवीर के एल राहुल लवकर बाद झाला. त्यानंतर रोहित आणि पुजाराने डाव संभाळला. तर विराट कोहलीने 55 धावा करत भारताच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, विराट बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी ढेपाळली.

दरम्यान, इंग्लंडचा गोलंदाज राॅबिन्सनने दुसऱ्या डावात धारदार गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना मैदानात टिकू दिलं नाही. त्याने दुसऱ्या डावात 5 गडी बाद केले. तर पहिल्या डावात देखील त्यानं 2 गडी बाद करत भारताचा मध्यक्रम मोडीस काढला होता. इंग्लंडच्या या विजयात कर्णधार जो रूट आणि राॅबिन्सनचा मोठा वाटा आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील’; तालिबानचं अफगाणी नागरिकांना नवं फर्मान

जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करू – निलेश राणे

राजनाथ सिंह यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा अमोल कोल्हेंनी घेतला समाचार

मोठी बातमी! नारायण राणेंना बसला वीजेचा शॅाक

“मी ठाकरे… माझ्या डीएनएमध्ये राजकारण आहे हे त्यांनी दाखवून दिलंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More