मुंबई | भारतात पहिल्यांदाच पेंग्विनचा जन्म झालाय. मुंबईतील राणीच्या बागेत हा पेंग्विन जन्माला आला आहे. पेंग्विनने अंडे दिल्यानंतर 40 दिवसांनी अंड्यातून पिल्लू बाहेर आले.
दोन वर्षांपूर्वी 26 जुलै 2016 रोजी हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते. पेंग्विनचे बाळंतपण सुखरूप होण्यासाठी डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली गेली.
दरम्यान, मुंबईकर या पेंग्विनची बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होते. अंड्याचा इनक्युबेशन काळ संपताच पेंग्विन जन्माला आल्याने मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आहे.
Our cute freedom baby! pic.twitter.com/v0ApNLDRwS
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 16, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन
-“भगवा फेटा बांधून भाषण केल्याने हिंदुत्वाचे प्रश्न सुटणार आहेत का?”
-धक्कादायक!!! हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा डाव होता?
-माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर; व्हेंटिलेटरवर ठेवल्याची माहिती
-शरद पवारांवर टीका केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा राडा