बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचं कोरोनाने निधन!

नवी दिल्ली | भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खासिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण महान खेळाडूला मुकलो आहोत. त्यांनी देशाच्या असंख्य नागरिकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणं  हे फार दुख:द आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 30 मे रोजी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मिल्खा सिंग यांच्या शरिरातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्यांना पीजीआयएमआर नेहरु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

दरम्यान, मिल्खासिंग यांच्या जीवनावर ‘भाग मिल्खा भाग’ या नावाचा चित्रपट देखील बनवण्यात आला होता. चित्रपटात मिल्खा सिंह यांच्या जीवनातील थोडासाच संघर्ष दाखवण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! राज्याचा रिकव्हरी रेट वाढला, वाचा आजची आकडेवारी

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

मोठी बातमी! पुण्यात पुन्हा लॉकडाऊन, महापौरांनी ट्विट करत दिली माहिती

‘शरीरसुखासाठी माझ्यावर जबरदस्ती केली होती’; ‘तारक मेहता’ फेम ‘या’ अभिनेत्रीचा मोठा गौप्यस्फोट

‘शिवसैनिकांचे राडे सुरूच राहिले तर…’; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More