देश

भारताचा ‘हा’ माजी दिग्गज क्रिकेटपटू भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात?

चंदीगड | आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना हर एक राजकीय पक्ष मतदारसंघातून लोकप्रिय उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. याचदरम्यान भारतीय क्रिकेटमधला माजी दिग्गज खेळाडू विरेंद्र सेहवाग भाजपकडून निवडणूक लढविणार असल्याचं कळतंय.

हरियाणातील रोहतक मतदारसंघातून सेहवाग निवडणूक लढवू शकतो असं कळतं आहे. रोहतक मतदारसंघात सध्या दीपेंद्र हुड्डा हे खासदार आहेत.

भाजपचे हरियाणा प्रदेश अध्यक्ष सुभाष बराला यांनी याबाबत कोणताही दुजोरा दिलेला नाही. सेहवागने अजून भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याचे कारण देत ही चर्चा खोटी असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ‘गौतम गंभीर’ आणि ‘सुफी गायक’ हे देखील भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र भाजपकडून कोणतीही माहिती याबाबत अद्याप मिळालेली नाही.

महत्वाच्या बातम्या-

-तेलतुंबडेंच्याविरोधातील कारवाई थांबवा, 600 परदेशी विचारवंताची सरकारकडे मागणी

नासाने उलगडलं पुणेकरांच्या बुद्धीमत्तेचं रहस्य!

“प्रितम मुडेंना टक्कर देणारा उमेदवार आहे काय?”

-कार्यकर्त्यानं रचलेलं गाणं ऐकूण उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू!

“माझं नशीब चांगलं, माझं नाव #MeeToo मध्ये नाही आलं”

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या