बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाॅक्सिंगमध्ये भारताचं पदक निश्चित; लवलीना बोर्गोहेनची दमदार कामगिरी

टोकिया | जपानने कोरोना रूग्णसंख्या नियंत्रणात आणून ऑलिम्पिक स्पर्धा यशस्वीरित्या सुरू करून दाखवल्या आहेत. 23 जुलैपासून टोकियो ऑलिम्पिकला सुरवात झाली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या बाॅक्सिंगमध्ये मेरी काॅम आणि मनु भाकर सारखे दिग्गज खेळाडू फेल ठरले आहेत. त्यानंतर आता सातव्या दिवशी भारतीय बाॅक्सर लवलीना बोर्गोहेनने भारतासाठी पदक निश्चित केलं आहे.

भारतीय महिला बाॅक्सर लवलीना बोर्गोहेन हिचा सामना चिनी तायपेच्या निएन चिन चेनशी झाला. 69 किलो वजनी गटातील हा क्वार्टर फायनल सामना होता. चिनी तायपेच्या निएन चिन चेनही माजी विश्वविजेता राहिली आहे. लवलीना बोर्गोहेनने निएन चिन चेनचा 4-1 असा पराभव करत पदकावर शिक्कामोर्तब केलं आहे.

पहिल्या सत्रात लवलीना बोर्गोहेनने आक्रमक खेळी केली. तीने विरोधी खेळाडूवर पंचचे तगडे वार केले. पहिल्या सत्रात 5 पैकी 3 पंचांनी भारताच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूने आक्रमक पंच लगावले. परंतु यावेळी देखील बोर्गोहेनने चांगला बचाव केला. त्यामुळ दुसरा सेट देखील तिने जिंकला. त्यावेळी सामना भारताच्या पक्षात जाणार हे निश्चित झालं.

दरम्यान, पुढील 3 पैकी 2 सेट जिंकत लवलीना बोर्गोहेनने सामना जिंकला आहे. त्याचबरोबर तिने आता सेमिफायनमध्ये धडक मारली आहे. त्याचचबरोबर आता भारताचं पदक देखील निश्चित झालंय. बाॅक्सिंगमध्ये 4 थ्या क्रमांकाच्या खेळाडूला कांस्यपदक देण्यात येतं.

थोडक्यात बातम्या-

नव्या कोरोना व्हायरसचं रहस्य उलगडलं; ‘माणसाच्या शरिरात गेल्यावर…’

नोकरीची बातमी | 1 लाख भारतीयांना ‘ही’ दिग्गज आयटी कंपनी देणार नोकरी

‘…म्हणून राज कुंद्राला अटक केलं’; मुंबई पोलिसांनी सांगितलं कारण

आरबीआयची मोठी कारवाई; ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द्

“आमच्या पंतप्रधानांनी 700 कोटी पाठवले, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी काय दिवे लावले ?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More