बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताची खराब सुरुवात; केएल राहूल पाठोपाठ विराट शुन्यावर बाद

अहमदाबाद | भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात नाणेफेक इंग्लंड संघाने जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताकडून केएल राहुल आणि शिखर धवनने डावाची सुरुवात केली. मात्र दुसऱ्याच षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने केएल राहुलला 1 धावेवर त्रिफळाचीत केले आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी विराट कोहली फलंदाजीला उतरला. मात्र तोही खास काही करु शकला नाही. त्याला शुन्यावर आदिल राशिदने बाद केले.

विराटचा झेल ख्रिस जॉर्डनने घेतला. ‘गब्बर’ शिखर धवन देखील 4 धावांवर बाद झाला आहे. त्यामुळे आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी रिषभ पंत फलंदाजीसाठी उतरला आहे. आता मैदानात रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर खेळत आहे.

दरम्यान, या सामन्यासाठी भारताने रोहित शर्माला विश्रांती दिली आहे. त्यामुळे भारताकडून सलामीला शिखर धवन आणि केएल राहुल सलामीला फलंदाजी करायला सुरुवात केली. तसेच 15 महिन्यांनंतर भुवनेश्वर कुमारने या सामन्यातून भारतीय टी-20 संघात पुनरागमन केले आहे.

थोडक्यात बातम्या –

“…तर 100 दिवसात पुण्यातील लोकसंख्येचं लसीकरण होऊ शकतं”

मोठी बातमी! राज्यात नागपूरनंतर आता आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन

बाळासाहेबांच्या 400 कोटींच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावानं रूग्णालय उभारा- इम्तियाज जलील

मलाच चपलीने मारलं! ‘या’ कारणाने महिलेच्या नाकातून येत होतं रक्त, डिलिव्हरी बॉयचा वेगळाच दावा

सख्ख्या मुलीने आईला दगडावर आपटून मारून टाकलं; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More