Indias Salary Hike | भारतातील नोकरदारांच्या पगारात वाढ झाली असली तरी, कर्जाचे ओझेही त्याच वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. एका अहवालानुसार, पगाराचा मोठा हिस्सा कर्जाचे हप्ते (EMI) भरण्यात जात असून, मालमत्तेमध्ये मोठी घट झाली आहे. दैनंदिन गरजा आणि इतर खर्चही उत्पन्नाचा मोठा भाग व्यापत आहेत. (Indias Salary Hike)
कर्जाचा बोजा आणि मालमत्तेत घट
अहवालात नमूद केले आहे की, भारतीय नागरिक त्यांच्या पगारातील सुमारे ३९% रक्कम कर्जाचे हप्ते भरण्यासाठी वापरत आहेत. गेल्या सहा वर्षांत (२०१९-२०२४) नोकरदारांच्या पगारात सरासरी ९.१ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी, २०२३ पासून भारतीयांच्या मालमत्तेत घट होऊन ती ५० वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. अनेक लोक घर खरेदी करत असले, तरी कर्जाच्या वाढत्या हप्त्यांमुळे आर्थिक ताण वाढत आहे.
वाढत्या पगारासोबतच, कर्जाच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२४ पर्यंत, वैयक्तिक कर्जाची थकबाकी ५५.३ लाख कोटी रुपये झाली आहे, जी १३.७% नी वाढ दर्शवते. गृहकर्जाची थकबाकी देखील २८.१ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
खर्चाचे स्वरूप आणि शहरांमधील फरक
अहवालात खर्चाच्या विविध बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पगारातील ३२% रक्कम दैनंदिन गरजांवर, तर २९% रक्कम कपडे, मनोरंजन आणि इतर गोष्टींवर खर्च होत आहे. वैद्यकीय खर्चाचा विचार केल्यास, मध्यम शहरांमध्ये (टियर-२ शहरे) राहणारे लोक सर्वाधिक म्हणजे दरमहा सरासरी २,४५० रुपये खर्च करतात, तर महानगरांमध्ये (Metro) हा खर्च (Per person) व्यक्ती दरमहा सरासरी २,०४८ रुपये इतका कमी आहे. टियर-२ शहरांमधील घरभाड्याचा खर्च टियर-१ शहरांपेक्षा ४.५% जास्त आहे. हॉटेलमधून जेवण मागवण्याचे प्रमाणही वाढले आहे. (Indias Salary Hike)
प्रवासासाठी लोक रेल्वेला प्राधान्य देत असून, ४८% खर्च रेल्वे प्रवासावर होतो. २२% खर्च रस्ते प्रवासावर, १७% राहण्यावर, तर १३% खर्च विमान प्रवासावर होतो.
Title : Indias Salary Hike Paradox Rising Debt, Falling Assets