बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किवींविरूद्ध भारताची मोठी रणनिती! ‘या’ दोन खेळाडूंना संघात संधी मिळण्याची शक्यता

मुंबई | टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा मानहानिकारक पराभव झाल्यानंतर आता भारताचा पुढचा सामना न्यूझीलंड विरूद्ध होणार आहे. पाकिस्तानने दोन्ही संघाचा पराभव केल्यामुळे उपांत्य फेरीमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ आता प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे भारताच्या संघात बदल करण्याची शक्यता आहे.

भारताने पाकिस्तानविरुद्ध वरूण चक्रवर्तीला संघात स्थान दिलं होतं. मात्र त्या सामन्यात वरूण चक्रवर्तीला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याच्या जागी भारताचा फिरकीपटू अश्विनला संधी देण्याची दाट शक्यता आहे. कारण आयपीएलमध्ये आणि सराव सामन्यात आश्विनने चमकदार कामगिरी केली होती.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी मुंबई इडियन्सचा फलंदाज ईशान किशानला संधी मिळण्याची शक्यता आहे. सराव सामन्यात किशानने धमाकेदार खेळी केली होती. हार्दिक संघात खेळणार की नाही, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. त्यामुळे आगामी सामन्यात हे दोन बदल करण्याच्या तयारीत संघ आहे.

दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा, के.एल.राहुल, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि रिषभ पंत सारखे खेळाडूंचा समावेश भारतीय संघात आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरूद्ध संघात कोणाला संधी मिळणार ते आता पाहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

पीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी! ऐन दिवाळीपूर्वी मिळणार तब्बल ‘इतके’ टक्के व्याजदर

‘आता तरी सरकारला जाग येणार का?’;’त्या’ घटनेवरून प्रविण दरेकरांचा संतप्त सवाल

“चीनवर बोलणारे सर्वज्ञानी संजय राऊत पंढरपूरवर गप्प का?”

सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव

“अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचं आमचं ध्येय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More