बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिननंतर आता भारताच्या ‘या’ स्टार क्रिकेटपटूला देखील कोरोनाची लागण!

मुंबई |  कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. बॉलिवुडमधील कलाकारांसह, मोठमोठाले उद्योगपती तर राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत युसूफने स्वत: ट्विट करत माहिती दिली.

माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला सौम्य लक्षणे होती. अहवाल आल्यानंतर मी माझ्या घरातच क्वारंटाईन झालो आहे. तसेच आवश्यक ती सर्व खबरदारी आणि औषधे मी घेत असल्याचं युसूफ पठानेनं म्हटलं आहे. तर माझ्याशी संपर्क साधलेल्या सर्वांनी लवकरात लवकर त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही युसूफने संपर्कात आलेल्यांना केलं आहे.

युसूफच्या अगोदर मास्टर ब्लास्टकर सचिन तेंडुलकरलाही आजच कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत सचिनने ट्विट करत माहिती दिली. सौम्य लक्षण दिसल्यानंतर मी स्वतः जाऊन कोरोनाची चाचणी करून घेतली आहे. माझी चाचणी पाॅसिटिव्ह आली आहे. तर बाकी घरच्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. मी स्वतःला घरीच क्वारंटाईन केलं आहे आणि डाॅक्टरांच्या सल्याप्रमाणे सर्व खबरदारी घेत आहे, असं सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली लागू केली आहे.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असणार आहे, तर मास्क न लावल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड ठोठावण्यात आला असून सर्व बागा आणि समुद्र किनाऱ्यावर निर्बंध, बार आणि हॉटेल, सिनेमागृह रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार आहेत.

 

थोडक्यात बातम्या- 

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

…म्हणून दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड याचं नाव चर्चेत!

ठाकरे सरकारने सांगितलेला ‘हा’ नवा नियम पाळा, अन्यथा भरावा लागेल 1000 रुपये दंड

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनाची स्थिती भीषण, अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत रांगा

‘सचिन सावंतांना उत्तर द्यायला भाजपचे ‘हे’ नेते खंबीर’; फडणवीसांनी उडवली खिल्ली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More