बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाब्बास रे पठ्ठ्या! सर्वाधिक गोलच्या स्पर्धेत भारताचा सुनिल छेत्री मेसीपेक्षा सरस

मुंबई | भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्रीने 2022च्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत दोन गोल करत मोठा विक्रम आपल्या नावे केला. पात्रता फेरीत बांगलादेशविरूद्ध छेत्रीने दोन गोल करत एकूण 74 आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत.

छेत्रीने 74 गोल पुर्ण गोल केल्यावर संयुक्त अरब अमिरातीच्या अली मबखौत आणि मेसी यांना मागे टाकत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या यादीमध्ये पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो 103 गोलसह पहिल्या स्थानावर आहे. तर 74 गोल करत सुनिल छेत्री दुसऱ्या स्थानावर तिसऱ्या स्थानावर 73 गोलसह अली मबखौत हा आहे.

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताने 2-0 ने विजय मिळवला आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या जगातील अव्वल 10 फुटबॉलपटूंमध्ये स्थान मिळवण्याकरिता छेत्रीला फक्त एका गोलची आवश्यकता आहे. भारताचा पुढील सामना 15 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

दरम्यान, मी किती गोल केले हे कधीच मोजत नाही. 10 वर्षांनी आपण यावर नक्की चर्चा करू. त्यावेळी नक्की किती गोल झाले हे मोजण्यासाठी मूसुद्धा तयार असेल आणि आत्तापर्यंतचे गोल हे इतिहास असल्याचं सुनिल छेत्री म्हणाला.

थोडक्यात बातम्या- 

मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हता- किशोरी पेडणेकर

‘आमचं घर’ काही दिवसांपासून संकटात आहे, प्राजक्ता माळीचा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ

राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे शरद पवारांच्या भेटीला; ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

‘मुख्यमंत्री लायक असते तर…’; नवनीत राणांची जहरी टीका

अनेक दिग्गज मंत्र्यासोबत काम करणारे विशेष अधिकारी राम खांडेकर यांचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More