बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरारक सामना, असा झाला भारताचा विजय!

पुणे | भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला. एवढंच नव्हे तीन सामन्यांची ही मालिका भारताने २-१ अशा फरकाने स्वतःच्या नावावर केली. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात इंग्लंडच्या शेपटाने भारताला कडवी झुंज दिली, मात्र ती अपयशी ठरली.

भारताने प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकी खेळ्यांच्या जोरावर इंग्लंडपुढे ३३० धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने ३२२ धावांपर्यंत मजल मारली, मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. इंग्लंडच्या सुरुवातीच्या फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. मात्र सॅम करनने एक बाजू लावून धरत शेवटच्या षटकापर्यंत भारताचं टेंशन वाढवलं होतं.

हा सामना चांगलाच रंगतदार झाला होता. शेवटच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी १४ धावांची गरज होती. यावेळी यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजनकडे विराटनं चेंडू सोपवला होता, या षटकात इंग्लंडला अवघ्या ६ धावा काढता आल्या. या विजयासह भारतानं या सीरिजवरही आपलं नाव कोरलं.

भारताकडून रिषभ पंतने ७८,  शिखर धवनने ६७, हार्दिक पांड्याने ६४ धावांची खेळी केली, इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. दुसरीकडे इंग्लंडकडून सॅम करननं जिगरबाज खेळी केली, त्याने नाबाद राहात ९५ धावा काढल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने ४ तर भुवनेश्वर कुमारने ३ विकेट घेतल्या.

थोडक्यात बातम्या-

ठोकर खाके आदमी ठाकूर बनता है!; मराठमोळ्या शार्दुलचं विरुकडून कौतुक

महाराष्ट्रात 15 दिवसांचा लाॅकडाऊन लागणार?; आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

पैसे खात नाही असा अधिकारी-कर्मचारी पोलीस दलात नाही- निवृत्त IPS मीरा बोरवणकर

पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढ काही थांबेना, आजही आकडेवारी धडकी भरवणारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पारंपारिक नृत्य करून साजरी केली होळी, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More