बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चक दे इंडिया! टोकियो ऑलिम्पिकमध्ये रोमहर्षक लढतीत भारताची विजयी सलामी

टोकियो | गेल्या काही दिवसात जपानमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. परंतु जपानने कोरोना रूग्णसंख्या नियंत्रणात आणून ऑलिम्पिक स्पर्धा यशस्वीरित्या सुरू करून दाखवल्या आहेत. 23 जुलैपासून टोकियो ऑलिम्पिकला सुरवात झाली आहे. दुसऱ्याच दिवशी भारत विरूद्ध न्यूझीलंडमध्ये हाॅकीचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला.

हाॅकीच्या ‘अ’ गटात भारत आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. शुक्रवारी अ गटाचा सामना खेळवला गेला. त्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला 3-2 अशा फरकाने धूळ चारली. सामना सुरू होताच सामन्यावर न्यूझीलंडने कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला. न्यूझीलंडच्या केन रसेलने 6 व्या मिनिटालाच गोल करत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारताने आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. भारताच्या रूपिंदर पाल सिंग याने 10 मिनिटाला गोल करत सामना बरोबरीत आणला.

पहिल्या सत्रात दोन्ही संघ बरोबरीवर होते. त्यानंतर भारताने न्यूझीलंडला आघाडी मिळू दिली नाही. भारताच्या हरमनप्रीत सिंगनं दुसऱ्या सत्राच्या 26 व्या मिनिटाला गोल करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच पुढच्या 7 मिनिटात त्यानं आणखी एक दमदार गोल करत भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. दोन गोलची आघाडी घेतल्यानंतर भारताने रक्षात्मक पद्धतीने खेळी केली. तर दुसरीकडे न्यूझीलंडने आक्रमक खेळी केली.

दरम्यान, न्यूझीलंडच्या स्टीफन जेनेसने 43 व्या मिनिटाला गोल केला आणि न्यूझीलंडच्या आशा कायम ठेवल्या होत्या. परंतू त्यानंतर त्यांना आणखी गोल करता आला नाही. अखेर भारतानं हा सामना 3-2 अशा फरकानं जिंकला. भारत आणि न्यूझीलंडमध्ये हा 8वा सामना होता. त्यात भारताने 5 वेळा विजय मिळवला आहे. आता भारताचा पुढील सामना तगड्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

लसीकरण केंद्रावर महिलांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

राजनाथ सिंह यांचा अजित पवारांना फोन, म्हणाले…

“त्यावेळी इंदिरा गांधी पुरत्या बदनाम झाल्या, आता आणीबाणीपेक्षा वेगळं काय घडत आहे?”

राज्यात पावसाचं थैमान; आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

केंद्र सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More