बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“क्रिकेटपेक्षा शेतीच बरी, टीममध्ये कोचला महत्व नाही”

नवी दिल्ली | भारताचा माजी फिरकीपटू रमेश पोवार याची भारतीय क्रिकेट महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील आठवड्यात त्याची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या या नियुक्तीनंतर चांगलाच वाद पेटला होता. अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. भारतीय क्रिकेट महिला संघाचे मावळते कोच वी रमन यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना मेल लिहून त्यांची बाजू मांडली होती. त्यानंतर आता माजी कोच पौर्णिमा राव यांनी बीसीसीआय प्रशासनावर आरोप केला आहे.

पौर्णिमा राव या टीमच्या शेवटच्या महिला कोच आहेत. त्याच्यानंतर महिला संघासाठी महिला प्रशिक्षक नियुक्त करण्यात आल्या नाही. त्यांच्यानंतर तुषार आरोठे, रमेश पोवार, वी रमन आणि पुन्हा एकदा रमेश पोवार यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. आपल्याला 2015-16 साली पदावरुन का काढण्यात आलं, याचं कोणतंही कारण सांगण्यात आलं नाही, असा आरोप पौर्णिमा राव यांनी केला आहे.

त्यावर्षी टीमनं वर्ल्डकप फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना पैसा, करार आणि सर्व काही मिळालं. खेळाडू यामधून सावरु शकले नाहीत. आता मी सेंद्रीय भाजी आणि फळांची शेती करते. यामध्ये मिळालेलं उत्पन्न परिवार आणि मित्रमंडळींमध्ये वाटते. मी या क्षणाचा आनंद घेत आहे. भारतीय महिला क्रिकेटमधून मला जे काही मिळालं, त्यापेक्षा हे खूप चांगलं आहे, असं देखील पौर्णिमा राव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पौर्णिमा राव यांनी 1993 ते 2000 या कालावधीमध्ये 5 टेस्ट आणि 33 वन-डे मध्ये भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केलं. त्या सध्या हैदराबादपासून 40 किलोमीटर एका ठिकाणी सेंद्रीय शेती करतात. त्यांनी भारतीय महिला प्रशिक्षकपदी महत्वाची भूमिका साकारली होती.

थोडक्यात बातम्या-

मोदींविरोधात पोस्टर लावले, पोलिसांकडून 100 जणांना अटक

पत्नीवर संशय असलेला पती करायला गेला एक अन् झालं असं काही की…

36 वर्षीय सामाजिक कार्यकर्तीला जाळ्यात ओढलं, तिच्याच बंगल्यावर राहून धक्कादायक प्रकार

सर्वात मोठी बातमी: कोरोनावरील लस घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही!

नवऱ्यानं केली नसबंदी, त्यानंतर पत्नी प्रेग्नंट राहिल्यानं छळ, तपासात धक्कादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More