बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरनाईक जे आता बोलले ते आम्ही 18 महिन्यांपूर्वी सांगत होतो, पण तेव्हा तुम्ही ऐकलं नाही”

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्रं लिहिलं आहे. या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण सरनाईक यांनी या पत्रात भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन शिवसेनेला केलं आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सरनाईक जे आता सांगत आहेत, तेच तर आम्ही 18 महिन्यांपूर्वी सांगत होतो. पण तेव्हा तुम्ही ऐकलं नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपसोबत पुन्हा युती करायला हवी, असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे. आता आम्ही याबद्दल आम्ही सकारात्मक बोलल्यास लगेच सामनामध्ये अग्रलेख येईल. सत्ता नसल्यानं यांच्या पोटात दुखत असल्याची टीका होईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

अल्पसंख्याकांचं लांगुलचालन मी करणार नाही, हीच बाळासाहेबांची भूमिका होती. या भूमिकेसाठी त्यांनी आयुष्यभर ज्यांच्याविरोधात संघर्ष केला, त्यांच्यासोबतच उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी वेगळी चूल मांडली, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. तसेच प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांनी त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. आता उद्धव ठाकरेंनी विचार करावा. त्यानंतर आमचे वरिष्ठ नेते, नेतृत्व विचार करेल, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.

दरम्यान, सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेलं बरं. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी पत्रात केल्याचं कळतंय.

थोडक्यात बातम्या- 

भन्नाट ऑफर! लस घेतल्यास पब आणि बारमध्ये मिळणार 50% सूट

जम्मू काश्मीरला पुन्हा स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळणार?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याचा तयारीत

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा ‘या’ वयोगटातील लोकांना अधिक धोका!

“ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही”

‘राष्ट्रवादी-शिवसेनेत वितुष्ट निर्माण होणार नाही’; सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतरही राष्ट्रवादीला विश्वास

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More