बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा नाही झाली तर काय होईल हे सांगायची गरज नाही”

कोल्हापूर | मूक आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेला बोलावलं. त्याचं मी स्वागत करतो. चर्चा सकारात्मक होईल याची अपेक्षा आहे. मात्र, चर्चा झाली नाही तर काय होईल हे मला सांगायची गरज नाही, असा सूचक इशारा खासदार संभाजीराजेंनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक होत आहे. पण आज ऐवजी उद्या भेट व्हावी अशी समन्वयकांची भूमिका होती. पण मुख्यमंत्र्यांचा आजच बैठक घेण्यासाठी आग्रह होता. त्यामुळे आज संध्याकाळी ही बैठक होत आहे. भेटी आधी समन्वयकांशी कोणतीही बैठक होणार नाही, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

मराठा आरक्षणासाठी काल मोर्चा काढल्यानंतर संभाजी छत्रपती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत पाच मागण्या आणि मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  आरक्षणविषयी मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यावर ही बैठक होईल. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक आणि ठाकरे सरकारमधील काही मंत्री देखील उपस्थित असतील.

दरम्यान, याआधी राज्य सरकारने चर्चेचं आमंत्रण दिलं असलं तरी नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगडचे नियोजित आंदोलन होणारच आहे, असं सांगतानाच सरकारबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यास नाशिकचे आंदोलन विजयोत्सव म्हणून साजरा करू, असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

भाजपला धक्का; माजी मंत्री काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत!

आयटीचं बँड वाजणार, 30 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता

शिवसेनेनं आता सामना बंद करून बाबरनामा काढावा- अतुल भातखळकर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आधी सचिनने भारतीय संघाला दिल्या ‘या’ खास टिप्स

“काँग्रेस पक्ष म्हणजे टायटॅनिकचं जहाज, तो बुडतच चाललाय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More