पी व्ही सिंधूशी विमान कर्मचाऱ्याचं असभ्य वर्तन, ट्विटरद्वारे व्यक्त केला राग

मुंबई | इंडिगो विमानातील ग्राऊंड स्टाफनं वाईट वागणूक दिल्याबद्दल भारताची बॅटमिंटन क्वीन पी. व्ही सिंधूनं ट्विटरवरून नाराजी आणि राग व्यक्त केलाय. हैदराबाद-मुंबई प्रवासादरम्यान ग्राऊंड स्टाफनं असभ्य आणि उद्दाम वर्तन केल्याचं तिनं म्हटलंय.

सिंधू एका कार्यक्रमासाठी इंडिगोच्या विमानानं मुंबईत पोहोचली. त्यादरम्यान एक कर्मचारी आपल्याशी उर्मट भाषेत बोलला, एका एअर होस्टेसनं त्याला नम्रपणे वागण्याचा सल्ला दिला. त्याने तिलाही उडवून लावलं, असं ट्वीट तिनं केलं.

अशा कर्मचाऱ्यांमुळे इंडिगोची बदनामी होत असल्याचं तिनं म्हटलंय.