नवी दिल्ली | माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना थेट हुकूमशहा हिटलरशी करुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
इंदिरा गांधी यांनी मुलभूत अधिकारांची पायमल्ली करत आणीबाणी लागू केली होती. हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी लोकशाहीला हुकूमशाहीत बदलण्यासाठी संविधानाचा वापर केला होता, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय.
आणीबाणीच्या काळात देशात भीतीचं वातावरण होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विरोधी पक्ष नेते आणीबाणीचा विरोध करत होते. सातत्याने सत्याग्रह होत होते, असंही जेटलींनी म्हटलंय.
Mrs. Gandhi’s imposition of Emergency under Article 352, suspension of fundamental rights under Article 359 and her claim that “disorder was planned by the opposition in the country”, echoed Hitler’s “Reichstag” episode as exposed by the Nuremberg trials after 13 years
— Arun Jaitley (@arunjaitley) June 25, 2018