Top News

“शिवसेनेने सदैव इंदिरांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि मर्दानगीचा आदर केला”

मुंबई | इंदिराजींच्या स्मृती कायमच्या मिटाव्यात असं ज्यांना वाटतं त्यांनाच इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वाची काळजी वाटावी हे आश्चर्यच. मात्र शिवसेनेने सदैव इंदिराजींच्या महान व्यक्तिमत्त्वाचा व त्यांच्यातील मर्दानगीचा आदर केला, असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

जेव्हा इंदिरा गांधींचे प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न झाला त्या त्या वेळी शिवसेना ढाल बनून मध्ये उभी राहिली. शिवसेनेने सोयीसाठी ना छत्रपती शिवरायांचा वापर केला, ना इंदिरा गांधींचा, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी या उत्तुंग व्यक्तिमत्त्वास ‘पेढेवाले’ वगैरे थिल्लर उपमा देऊन त्यांचे हसे करणाऱ्यांच्या बाजूने संपूर्ण भाजप उभा ठाकला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो, पण इंदिरा गांधीही प्रिय झाल्या याचा सगळ्यात जास्त आनंद आहे, असा टोलाही भाजपला लगावला आहे.

शिवरायांनी मावळ्यांना स्वराज्याचं ध्येय दिलं होतं. जुलूमाविरुद्ध लढण्याचे धैर्य दिलं होतं. हे शिवरायांचे नाव घेऊन विरोधासाठी विरोध करणाऱ्यांनी विसरू नये. शिवराय जरा समजून घ्या इतकेच त्यांना आम्हाला सांगायचे आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

संजय राऊतांच्या तोंडून उद्धव ठाकरे तर बोलत नाहीत ना?; नारायण राणेंना संशय

जीभ ठेवणार नाही म्हणणाऱ्या नारायण राणेंना राऊतांचं सडेतोड उत्तर

‘धोनी आता बस्स कर’; BCCI चे धोनीला अप्रत्यक्ष संकेत

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या