Top News मनोरंजन मुंबई राजकारण

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे; उर्मिला मातोंडकरांचा कंगणाला अप्रत्यक्ष टोला

मुंबई | मुंबईत राहण्यासाठी इतर कोणाच्या परवानगीची गरज लागत नसल्याचं विधान कंगणा राणावतने केलं होतं. याला शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्युत्तर दिलंय.

बाईच्या डोक्यावर अपघात झाला की काय?, अशा शब्दात उर्मिला मातोंडकर यांनी अप्रत्यक्षपणे कंगणावर निशाणा साधला आहे. यासंदर्भात उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट केलंय.

“माझ्या प्रिय मुंबईच्या पाठी उभं राहण्यासाठी…बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ…”, अशा आशयाचं ट्विट उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे.

कंगणा राणावतने आज सिद्धीविनायक गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी, मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. इतर कोणाकडेही मी परवानगी मागितलेली नाही, असं वक्तव्य कंगणाने केलं.

थोडक्यात बातम्या-

शाब्बास! अजिंक्य रहाणेने केली डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी

भारत-ब्रिटन विमान प्रवासावरील बंदीत वाढ होणार; उड्डाणमंत्र्यांचे संकेत

हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा; भाजप आमदाराची टीका

10 वर्षांपासून स्वतःला खोलीत बंद ठेवलं; उच्चशिक्षित 3 भावंडांची कहाणी

मोठी बातमी! रजनीकांत राजकीय पक्ष स्थापन करणार नाहीत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या