Maharashtra l राज्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशातच आता जळगावच्या भुसावळ शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. भुसावळ शहरात अज्ञातांनी गोळीबार केला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे भुसावळमधील नागरिक भयभीत झाले आहेत.
भुसावळामध्ये अज्ञातांनी केला अंदाधुंद गोळीबार :
यासंदर्भात सविस्तर वृत्त असं की, जळगावच्या भुसावळ शहरात अज्ञातांनी गोळीबार केला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांमध्ये एका माजी नगरसेवकाचा समावेश असून त्यांचा एक सहकारी देखील आहे. मात्र या गोळीबाराच्या घटनेत ते दोघेही मृत्युमुखी पडले आहेत. भुसावळ शहरातील जुना सातारा रोड भागात कारमधून जात असलेल्या चौघांवर अज्ञातांनी अचानकपणे गोळीबार केल्याची घटना घडली. यावेळी दोघांवर गोळीबार झाला त्यामुळे दोन जण मृत्युमुखी पडले आहेत.
भुसावळ शहरात झालेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या माजी नगरसेवक हा संतोष बारसे होता. बारसे यांच्यासोबत इतर तिघे जण कारमधून जात असताना त्यांच्या कारवर अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. मात्र गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसेंसह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र या घटनेनं संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
Maharashtra l नेमकं भुसावळमध्ये काय घडलं? :
या सर्व प्रकार मरिमाता मंदिर परिसराजवळ झाला आहे. यामध्ये कार घटनास्थळी येताच दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याने ते कार मध्येच जागेवर कोसळले होते. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषित केलं. त्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले.
या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तातडीने संपूर्ण भुसावळ शहरात नाकाबंदी करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र आरोपी फरार असल्याने आरोपीला अद्याप तरी अटक करण्यात आली नाही. मात्र ही संपूर्ण घटना व त्यामागचं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र यासंदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत.
News Title – Indiscriminate firing by unknown persons on cars in Bhusawal; One death, including a former councillor
महत्त्वाच्या बातम्या
पुणे पोलिसांनी कॅफेवर टाकला छापा, अंधार करुन रंगला होता धक्कादायक खेळ
पुढील काही दिवसांत ‘या’ राशीच्या व्यक्तींना राजकारणातून गोड बातमी मिळेल
मनोज जरांगेंच्या जीवनावर आणखी एक सिनेमा येणार, तारीख आली समोर
महायुतीसाठी चिंताजनक बातमी; भाजपला पहिला धक्का महाराष्ट्र देणार?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी!