बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारत-चीनमधील तणाव निवळला; दोन्ही देशांनी सैन्य माघारी बोलावलं

लडाख | प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवरुन या दोन्ही देशांमध्ये तणाव पहायला मिळत होता. अखेर दोन्ही देशांनी याप्रकरणी माघार घेतली आहे.

पूर्व लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकलं आहे, तसेच त्यांनी आपली वाहनं देखील मागे घेतली आहेत. त्यानंतर भारतानं देखील आपलं सैन्य माघारी घेतलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात ट्विट केलं आहे.

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. यामध्ये सुसंवाद घडल्याची माहिती समोर आली होती. परस्पर सहमतीनं दोन्ही देशांनी यावर तोडगा काढल्याचं बोललं जातंय.

सोमवारी रात्रीपासून सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली, मंगळवारी पहाटेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. चीननं सैन्य हटवल्यानं भारतानं देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि आपल्या सैन्याला माघारी बोलावलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ सचिन वाझे 16 वर्षांनंतर पुन्हा पोलिसात दाखल, इथं आहे नेमणूक!

….म्हणून मला शिवभक्तांचा सार्थ अभिमान, त्यांच्या समोर मी नतमस्तक- छत्रपती संभाजीराजे

महत्वाच्या बातम्या-

‘निसर्ग’मुळे कंबर मोडलेल्या कोकणवासियांना शरद पवारांनी असा दिला धीर

रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री…; राष्ट्रवादीचं राजनाथ सिहांना सणसणीत प्रत्युत्तर

शरद पवार कोकण दौऱ्यासाठी रवाना; थोड्याच वेळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेणार भेट

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More