इंदौर | भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचा मुलगा आणि भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांची गुंडगिरी पाहायला मिळाली. इंदौरमध्ये पालिका अधिकाऱ्याला चक्क क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
इंदौरमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याच्या सूचना पालिकेच्यावतीने देण्यात आल्या होत्या. अशातच पालिकेचे अधिकारी जीर्ण घराच्या पाडकाम करण्यासाठी आले होते.
आकाश विजयवर्गीय घटनास्थळी पोहोचले. पालिकेचे अधिकारी आणि आकाश यांच्यात चांगलाच वाद पेटला. वाद विकोपाला पोहचला आणि आकाश यांनी पालिका अधिकाऱ्यांना क्रिकेटच्या बॅटने मारहाण करण्यात आली.
आकाश विजयवर्गीय यांच्या समर्थकांनीदेखील पालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली.
महत्वाच्या बातम्या
-महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांवर घोटाळ्याचा आरोप, सभागृहात जोरदार गोंधळ
-शिवरायांच्या पुतळ्याशेजारी शंभूराजांचा पुतळा स्थापन करण्याचा संकल्प करा!
-शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य पावलं उचला; उपराष्ट्रपतींचा अर्थमंत्र्यांना सल्ला
-अजित पवार चांगलेच खवळले, संबंधित मंत्री पळत सभागृहात!
-भारतीय क्रिकेट संघाच्या भगव्या जर्सीला ‘या’ नेत्याचा विरोध
Comments are closed.