Top News नाशिक महाराष्ट्र

…अन् इंदोरीकर महाराज ढसाढसा रडले; पाहा व्हिडीओ

नाशिक | आपल्या कीर्तनातून सर्वांना हसवणारे प्रसिद्ध कीर्तनकार, समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांचा ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

इंदोरीकर महाराज यांचे सहकारी येवला तालुक्यातील ठाणगाव येथे लोकप्रिय असलेले प्रसिद्ध मृदंगाचार्य श्रीहरी रमेश शेळके यांचं वयाच्या 30 वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं आहे. दुःखद प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

इंदोरीकर महाजांचं नाव काढलं तरी चेहऱ्यावर आपोआप हसु येतं. मात्र माणूस हा भावनाशील असतो हे आपल्याला इंदोरीकरांच्या रडण्यातून दिसून येईल. आपला जवळचा कोणीतरी गेल्यावर आपण निशब्द होतो त्याप्रमाणे इंदोरीकरांचा जवळचा सहकारी गेल्याने तेसुद्धा निशब्द होऊन अश्रूंमधून आपलं दु:ख व्यक्त करताना दिसले.

दरम्यान, श्रीहरी रमेश शेळके यांच्याअंत्यसंस्काराप्रसंगी उपस्थित इंदोरीकर महाराज यांना अश्रू अनावर झाले. यावेळी सहकारी मित्र डॉ. चव्हाण यांच्या गळ्यात पडून रडतानाचा महाराजांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

मराठी नंबर प्लेटवर कारवाई ही मातृभाषेची गळचेपी- राजू पाटील

अकरावी, आयटीआय आणि इतर प्रवेश प्रक्रियांचा मार्ग आता झाला मोकळा!

‘तो’ निर्णय माझा व्यक्तिगत नव्हता, सरकारचा होता- नितीन राऊत

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू

“नारायण राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या