Top News

अखेर इंदोरीकर महाराजांची माघार; व्यक्त केली दिलगिरी!

Loading...

अहमदनगर | ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. त्यानंतर आता त्यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रक जारी केलं आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो, असं या पत्रकात त्यांनी म्हंटल आहे.

मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून माझ्या 26 वर्षांच्या कार्यकाळात समाजप्रबोधन, समाज संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन आणि विविध जाच रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनातून या वाक्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा, असं म्हणत इंदोरीकरांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.

गेल्या 8 दिवसांपासून माझ्या कीर्तनातून मी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि इतर समाजमाध्यमात माझ्या अभ्यासानुसार माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय, असं इंदोरीकर आपल्या पत्रकात म्हणाले आहेत.

दरम्यान, इंदोरीकरांच्या वक्तव्यामुळे समर्थनार्थ आणि विरोधात असे 2 गट पडले होते. हा वाद आणखी चिघळण्याआधी त्यांनी दिलगीरी व्यक्त करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

इंदुरीकरांनी 25 वर्षात अनेक चुकीच्या चालीरीती बंद केल्या- बाळासाहेब थोरात

“इंदुरीकरांच्या सांगण्यावरुन मला अनेकांनी धमक्या दिल्या”

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत इंदोरीकरांचं कीर्तन बसत नाही- सदानंद मोरे

भाजप कार्यकर्ते आहत का? सगळे बीळात शिरले- नवाब मलिक

तृप्ती देसाई, नगरमध्ये येऊन दाखवाच; शिवसेनेच्या आष्टेकरांचं आव्हान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या