Top News पुणे

मी मरेन पण तुम्हाला रोज माझ्या वाक्यांची आठवण होणार- इंदोरीकर महाराज

पुणे | मी एकवेळ मरेन पण तुम्हाला रोज माझ्या वाक्यांची आठवण येईल. सध्या खरं बोललो की किती त्रास होतो ते आम्हाला माहित आहे, असं म्हणत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी खंत व्यक्त केली.

पुण्यातील कोथरूडमध्ये तुळजाभवनी माता आणि राधाकृष्ण सेवा संस्थेच्या राधाकृष्ण मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तनात इंदोरीकर महाराज बोलत होते.

जगात देव आहेच मात्र तो संतांशिवाय समजत नाही. मात्र आजकालच्या व्यक्तींना संत म्हणता येत नाही. भाकरी ऐवजी सफरचंद खातो आणि लग्न करण्याऐवजी टिकटॉक बघतो तो संत नसून भामटा आहे, असं म्हणत इंदोरीकरांनी कीर्तनात हास्याचे कारंजे उडवले.

दरम्यान, सध्याच्या काळात आईवडील हेच देव आहेत. त्यांच्या संस्कारांमुळे चांगले दिवस आलेत हे मुलांनी विसरता कामा नये, असंही त्यांनी आपल्या कीर्तनात म्हटलं आहे.

ट्रेडिंग बातम्या- 

मराठी भाषा खऱ्या अर्थाने शक्ती आणि भक्तीची- मुख्यमंत्री

“आम आदमी पक्षाला अमित शहांनी विकत घेतलंय का?”

महत्वाच्या बातम्या- 

मराठी भाषा खऱ्या अर्थाने शक्ती आणि भक्तीची- मुख्यमंत्री

खरं बोललो तर किती त्रास होतो ते आम्हालाच माहिती- इंदोरीकर महाराज

राज्यात पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा; विधेयक मंजूर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या