पुणे | खरं बोललो की किती त्रास होतो ते आम्हालाच माहिती, अशी खंत ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच मी एकवेळ मरेन पण तुम्हाला रोज माझ्या वाक्यांची आठवण येईल, असंही इंदोरीकरांनी सांगितलं.
पुण्यातील कोथरूडमध्ये तुळजाभवनी माता आणि राधाकृष्ण सेवा संस्थेच्या राधाकृष्ण मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तनात इंदोरीकर महाराज बोलत होते.
जगात देव आहेच मात्र तो संतांशिवाय समजत नाही. मात्र आजकालच्या व्यक्तींना संत म्हणता येत नाही. भाकरी ऐवजी सफरचंद खातो आणि लग्न करण्याऐवजी टिकटॉक बघतो तो संत नसून भामटा आहे, असं इंदोरीकरांनी यावेळी किर्तनात सांगितलं.
दरम्यान, सध्याच्या काळात आईवडील हेच देव आहेत. त्यांच्या संस्कारांमुळे चांगले दिवस आलेत हे मुलांनी विसरता कामा नये, असंही इंदोरीकरांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातम्या-
असुराचा वध करायला महाराष्ट्रातील रणरागिणी मागे हटणार नाही- रूपाली चाकणकर
माझ्या वाढदिवसानिमित्त सुट्टी जाहीर करा; ‘या’ अभिनेत्रीची मागणी
महत्वाच्या बातम्या-
आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही दिशा कायदा लागू करणार- अनिल देशमुख
तुमची मुलं इंग्रजी शाळेत का शिकली?; उद्धव ठाकरे म्हणाले…
“दिल्लीत दुसऱ्यांदा 1984 ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही”
Comments are closed.