बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या, सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल

संगमनेर | प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे स्री संगाविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर जिल्हा आरोग्य प्रशासनाने खटला दाखल केला होता. मात्र, संगमनेर सत्र न्यायालयाने इंदोरीकरांच्या बाजूने निकाल देत त्यांना दिलासा दिला होता. आता याप्रकरणी उच्च न्यायालयात सरकारी पक्षाकडून इंदोरीकरांविरुद्ध आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

औरंगाबाद उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी सरकारी पक्षाने खंडपीठात ही याचिका दाखल केली आहे. सत्र न्यायालयाने जरी इंदोरीकरांना दिलासा दिला असला तरी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने इंदोरीकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता औरंगाबाद उच्च न्यायालय याप्रकरणी सत्र न्यायालयाप्रमाणे इंदोरीकरांना दिलासा देणार की दोषी ठरवणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, स्त्री संगम सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते, असं वादग्रस्त वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी केलं होतं.

या वादग्रस्त वक्तव्यानंतर काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, याबाबत कोणताही पुरावा नसल्यानं त्यांच्यावर जिल्हा आरोग्य विभागाने गुन्हा दाखल केला नव्हता. अंनिसच्या रंजना गवांदे यांनी यासंदर्भातील पुरावे जमा करत जिल्हा आरोग्य विभागाला दिले होते. यानंतर संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

थोडक्यात बातम्या – 

ह्रदयद्रावक! पुराचं पाणी शिरल्याने चिपळूणच्या कोविड सेंटरमधील व्हेंटिलेटरवरील 8 रुग्णांचा मृत्यू

‘राजने नव्या अ‍ॅपसाठी सई ताम्हणकरलासुद्धा…’; पॉर्नोग्राफी केसमध्ये गहनाचा धक्कादायक खुलासा!

“‘मुख्यमंत्री मंत्रालयात गेले’ ही बातमी व्हावी इतके वाईट दिवस महाराष्ट्रावर आलेत”

मोठी बातमी! शाळेच्या अभ्यासक्रमाबाबत शिक्षणमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

महाराष्ट्रात पावसाचं रौद्र रुप! वरंध्याच्या घाटात गेल्या 24 तासांत 30 ठिकाणी दरडी कोसळल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More