मी राजकारणात आले तर तिसरं महायुद्ध घडेल!

वॉशिंग्टन | मी राजकारणात सहभागी झाले असते, तर तिसऱ्या महायुद्धाला निमित्त ठरले असते, असं वक्तव्य पॅप्सिको कंपनीच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुई यांनी केलं आहे.

एका कार्यक्रमात नुई यांना विचारण्यात आलं होतं की, तुम्हाला ट्रम्प कॅबिनेटमध्ये सामील होण्याची इच्छा आहे का?. त्यावर मला आणि राजकारणाला दोघांनाही एकत्र करू नका. अन्यथा मी तिसऱ्या महायुद्धाला कारण ठरेन, असं नुई यांनी म्हटलं.

मी खूप स्पष्टवक्ती आहे. मला कुटनीती जमत नाही आणि मला ती समजतही नाही, असं नुई यांनी म्हटलं.

दरम्यान, इंद्रा नुई या मुळच्या भारतीय वंशाच्या असून त्यांनी अमेरीकेचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. फोर्ब्स मासिकाच्या जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत इंद्रा नुई यांना 2008 साली तेराव्या स्थानावर होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-येवलेकरांचे उपकार मी कधीच विसरणार नाही- छगन भुजबळ

-जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी, मी नानांसोबत आहे!

-…म्हणून भाजपच्या माजी आमदारानं छत्रपतींच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागावी!

-…म्हणून मोदींनी 15 लाखाचं आश्वासन दिलं होतं- नितीन गडकरी

-…त्या शिवाय पोलिसांनी देवीकडे जाऊ नये; संभाजी भिडेंच्या पोलिसांना सूचना