बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शीना बोरा जिवंत, काश्मीरमध्ये तपास करा’; इंद्राणी मुखर्जींच्या दाव्याने देश हादरलं

मुंबई | जगप्रसिद्ध अशा शीना बोरा हत्याकांडमध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जीनेच या प्रकरणात नवा खुलासा केला आहे. शीना बोरा जिवंत असल्याचा धक्कादायक खुलासा इंद्राणी मुखर्जीने केला आहे.

इंद्राणी मुखर्जीने (Indrani Mukharjee) कारागृहातून सीबीआयला एक पत्र लिहिलं आहे. शीना बोरा (Sheena Bora) जिवंत असल्याचा दावा इंद्राणीने या पत्रात केला आहे. इतकंच नाही तर शीनाला एका महिलेने कश्मीरमध्ये पाहिलं असल्याचं इंद्राणीने पत्रात लिहिलं आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानूसार, इंद्राणीने तुरूंगात एका महिलेला भेटल्याचं पत्रात नमूद केलं आहे. त्या महिलेने शीनाला कश्मीरमध्ये भेटल्याचं सांगितलं. त्यामुळे शीनाचा कश्मीरमध्ये शोध घ्या असं इंद्राणीने पत्र लिहित सीबीआयला (CBI) सांगितलं आहे.

या पत्राव्यतिरिक्त तिने विशेष सीबीआय न्यायालयासमोर एक अर्ज दिला असून त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. 2015 साली शीना बोरा हत्याकांडात इंद्राणी मुखर्जीला अटक झाली आणि तेव्हापासून ती भायखळा कारागृहात आहे. इंद्राणीने केलेल्या खुलास्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

 थोडक्यात बातम्या-

अंकिता लोखंडेला पतीने लग्नात दिलं खास गिफ्ट; किंमत ऐकून थक्क व्हाल

Gold Silver Price: सोने चांदीचे भाव पुन्हा वधारले; वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे दर

जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…

“मुस्लिमांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही तर ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होणार?”

“महाविकास आघाडी सरकारच्या टाळाटाळीमुळे ओबीसी समाजाचे आरक्षण गेले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More