इंद्राणीला तुरुंगात फेशियल आणि मसाज मिळतो!

मुंबई | शिना बोरा हत्याकांडाप्रकरणी भायखळा तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला मसाज, फेशियलसारख्या सुविधा मिळत असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलाय. 

या सर्व सुविधांसाठी मंजुळा शेट्येची मदत घेतल्याची चर्चा होत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे या सर्व प्रकरणावरही सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, मंजुळा शेट्येच्या शरीरावर जखमा नव्हत्या, असा अहवाल देणाऱ्या डॉक्टरची चौकशी करण्याची त्यांची मागणी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी मान्य केली. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या