‘अहंकारी झाले त्यांना प्रभू श्रीरामाने…’; आरएसएसची भाजपवर बोचरी टीका

Indresh Kumar | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या निराशजनक कामगिरीवर भाष्य केलं आहे. त्यांचा पराभव होण्यामागे अंहकार कारणीभूत असल्याचं इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी म्हटलं. निवडणुकीत झालेल्या पराभवात भाजपला त्यांच्या वैचारिक मातृसंस्थेकडून टीकेचा सामना करावा लागला.

काय म्हणाले इंद्रेश कुमार?

जयपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, ज्यांनी प्रभू रामाची भक्ती केली ते हळूहळू अहंकारी बनले. त्याच पक्षाला आता सर्वात मोठा पक्ष म्हणून घोषित करण्यात आलं. मात्र आता अहंकारामुळे प्रभू श्रीरामाने त्यांना केवळ 240 वर थांबवले, असं इंद्रेश कुमार (Indresh Kumar) म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत 240 सर्वाधिक जागा जिंकलेल्या पण बहुमताचा आकडा ओलांडण्यात अपयशी ठरलेल्या भाजप पक्षावर वारंवर टीका झाल्याचं दिसून आलं. भाजपचं 2014 या वर्षानंतर सर्वात वाईट प्रदर्शन होतं. यावेळी बोलत असताना कुमार यांनी इंडिया आघाडीवर देखील टीका केल्याचं दिसत आहे.

त्यांचाच घमेंडीपणा असतो

जनसेवेत नम्रता आवश्यक असल्याचं काही दिवसांआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं. भागवत म्हणाले, खरा सेवक प्रतिष्ठा राखतो. काम करते वेळी तो शिष्टाचार पाळतो. मी हे काम केलं असं म्हणण्याचा त्यांच्याच घमेंडीपणा असतो. तोच खरा सेवक म्हणता येईल, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता वक्तव्य केलं आहे.

अहिंसा आणि सत्याच्या तत्त्वांचा हवाला दिला असल्याचं भागवत यांनी सर्वांप्रती नम्रता आणि सद्धभावनेची गरज त्यांनी व्यक्त केली असल्याची माहिती आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकाचा राज्यातील निकाल पाहिल्यास महाविकास आघाडी ही महायुतीपेक्षा अनेक पाऊलं पुढे आहेत. महाविकास आघाडीने राज्यात 30 जागांवर विजय मिळवला आहे. तर महायुती हा 17 जागांवर विजयी आहे. तर एनडीएने 293 जागांवर विजय मिळवला. तसेच इंडिया आघाडीने 232 जागांवर विजय मिळवल्याचं दिसून आलं आहे.

News Title – Indresh Kumar BJP Criticism Arrogant Stopped At 240 By Lord Ram

महत्त्वाच्या बातम्या

बाळाला सेरेलॅक खाऊ घालताय?, अगोदर ही धक्कादायक माहिती नक्की जाणून घ्या

विद्या बालनच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओची सगळीकडे एकच चर्चा!

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस धो-धो बरसणार

भन्नाट फीचर्ससह BMW कंपनीची बाईक बाजारात लाँच; किंमत काय असणार?

निलेश लंके वादात अडकणार?; कुख्यात गुंड गजा मारणेची भेट स्वीकारली