बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘इंद्रायणी थडी’त होणार रमाबाई आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण!

पुणे |  महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा ‘इंद्रायणी थडी’ भोसरीमध्ये भरवली जात आहे. या जत्रेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कार्याला ‘सलाम’ केला आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील रमाबाई यांच्या पुतळ्याची प्रतिकृती जत्रेच्या प्रवेशद्वारासमोरच उभारली आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला डॉ. आंबेडकर आणि रमाबाईंच्या कार्याचे स्मरण होईल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

भोसरी येथील गावजत्रा मैदानावर भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने ‘इंद्रायणी थडी’ जत्रा भरवली जात आहे. दि.३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२० असे चार दिवस सकाळी १० ते रात्री १० ही जत्रा सुरू राहील. ‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ अशी थीम घेवून भरविण्यात आलेल्या जत्रेत सर्वांना निशुल्क प्रवेश मिळणार आहे.

अयोध्योतील राम मंदिराची प्रतिकृती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा, ‘रामायण’ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो, ऐतिहासिक फुलेवाडा प्रतिकृती, ग्राम संस्कृती, बाल जत्रा यासह शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, गड-किल्ले छायाचित्र प्रदर्शन आदी विविध बाबींमुळे जत्रा ‘रेकॉर्ड ब्रेक’ ठरणार आहे.

शिल्पकार महेंद्र थोपटे आणि योगेश कुंभार यांनी पुण्यातील रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती साकारली आहे. त्याचे अनावरण आमदार लांडगे यांच्या हस्ते बुधवारी सकाळी करण्यात आले.

ट्रेंडिंग बातम्या-

शिवभोजनासाठी भलीमोठी रांग; गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचा बंदोबस्त

“देशद्रोह्यांना बिर्याणी नाही, तर गोळ्या घातल्या पाहिजेत”

महत्वाच्या बातम्या-

सरपंचाची थेट निवडणूक पद्धत रद्द; ठाकरे सरकारचा निर्णय

देशातील सर्व बॉम्बस्फोटांमध्ये आरएसएसचा हात- निवृत्त न्यायाधीश

देवेंद्र फडणवीसांचा खास माणूस झाला भाजपचा पुणे शहराध्यक्ष!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More