Top News

आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं किर्तन सोडून शेती करणार- इंदुरीकर

Loading...

अहमदनगर | सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य केल्याने निवृत्ती इंदुरीकर महाराज चांगलेचं अडचणीत सापडले आहेत. या सर्व परिस्थितीवर काल रात्री एका किर्तनात इंदुरीकरांनी भाष्य केलं आहे.

मी कशात सापडत नाही म्हणून मला अडकवण्याचा प्रयत्न सुरुय. मी तर आता या मुद्द्यावर आलो आहे की, 1-2दिवस जाऊ द्यायचा, आता लय झालं, फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कपॅसिटी संपली, असं म्हणत इंदुरीकरांनी या वादाला वैतागल्याचं सांगितलं आहे.

2 तासांच्या भाषणात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. पण मी जे बोललो ते चुकीचं नाहीच. मी बोललो ते अनेक ग्रंथांमध्ये नमूद केलेलं आहे. यूट्यूबवाले काड्या करतात. यूट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु सांगतो चॅनल संपतील पण मी नाही, असं इंदुरीकर म्हणाले आहेत.

दरम्यान, मी म्हणतोय हे खरंय. तरी लोकं म्हणतायेत याला ठेऊन द्या पहिलं. आणि चारी बाजूला… तीन दिवसात अर्धा किलोने कमी झालो हो या वादाने मला त्रास होतोय. एक दोन दिवस बघेन अन् किर्तन सोडून शेती करेन, असं म्हणत त्यांनी या सगळ्या वादाला कंटाळले असल्याचं म्हंटलंय.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

महापरीक्षा पोर्टलसंदर्भात महाविकास आघाडी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

मिसेस फडणवीसांनी गायलं इंग्रजी गाणं; सोशल मीडियावर ट्रोल

महत्वाच्या बातम्या-

“सत्तेसाठी भुकेल्या शरद पवारांनी उसनं अवसान आणू नये”

शांततेच्या मार्गानं सीएएला विरोध करणारे देशद्रोही होत नाही- हाय कोर्ट

राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या