Top News

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदूरीकर महाराजांना पहिला झटका!

बी़ड | प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांनी केलेलं वक्तव्य त्यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यामुळं इंदुरीकरांचं बीड जिल्ह्यातील नाळवंड गावानं त्यांचं होणारं कीर्तन रद्द केलं आहे.

गावात महिलांसमोर प्रबोधनकार म्हणून आपण त्याचं कीर्तन ठेवणार आणि त्या प्रबोधनकारानं मुलगा जन्मण्यासाठीचा सल्ला देणं म्हणजेच मुलींच्या जन्माला ते नाकारत आहेत. मग अशा महाराजांचं कीर्तन गावात आम्ही न ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं आहे.

नाळवंड गावच्या ग्रामस्थांनी यात्रेनिमित्त 4 एप्रिलला त्याचं कीर्तन गावकऱ्यांनी ठेवलं होतं. मात्र इंदुरीकरांच्या वक्तव्यामुळं त्यांची ही कीर्तनाची सुपारी गेली आहे.

दरम्यान, ओझर येथे झालेल्या कीर्तनात सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असा ऑड-इव्हनच्या फॉर्मुला इंदुरीकरांकर महाराजांनी केला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

आमदार सुनील टिंगरेंच्या नावानं मागितली जातेय खंडणी; टिंगरे, म्हणे तो मी नव्हेच!

कोणी जेलमध्ये टाकायची भाषा केली तर पवार साहेबांना आठवा- रोहित पवार

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांकडून महावितरणाने केली 22 हजार कोटींची लूट!

“सरकारच्या निर्णयामुळे एक दिवसाचा शासनाचा खर्च वाचला, उगाच बोंबाबोंब करू नये”

शरद पवारांचं गृहमंत्र्यांना पत्र; पोलिसांसाठी केली ‘ही’ मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या