महाराष्ट्र मुंबई

इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा; अंद्धश्रद्धा निर्मुलन समितीची मागणी

मुंबई | प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनात सांगितलेल्या ऑड-इव्हनच्या फॉर्मुल्यामुळं त्यांच्यावर त्वरीत गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे. सांगली येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली आहे.

अन्य कोणत्याही राज्याला नाही एवढी पुरोगामी संत व समाजसुधारकांची परंपरा महाराष्ट्र राज्याला लाभली आहे. वारकरी सांप्रदायाचे कीर्तन हे तर समाज प्रबोधनाचे मोठे साधन आहे. मात्र इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य हे अशास्त्रीय असल्याचं अविनाश पाटील यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रातील संत-समाजसुधारकांचा पुरोगामी वारसा पुढे चालविण्याचं काम करते. त्यामुळे आम्ही महाराजांच्या या अशास्त्रीय वक्तव्यांचा धिक्कार करत असल्याचं पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्यानं इंदुरीकरांचं बीड जिल्ह्यातील नाळवंड गावानं त्यांचं होणारं कीर्तन रद्द केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

आमदार सुनील टिंगरेंच्या नावानं मागितली जातेय खंडणी; टिंगरे, म्हणे तो मी नव्हेच!

कोणी जेलमध्ये टाकायची भाषा केली तर पवार साहेबांना आठवा- रोहित पवार

महत्वाच्या बातम्या-

क्रिकेट हा खेळ ‘जेंटलमेन्स गेम’ राहीला नाही- कपील देव

मुख्यमंत्र्यांचा मुलगा स्वखर्चाने उभारणार शिवाजी महाराजांचा पुतळा

भारत भेटीला येणाऱ्या ट्रम्पंना झोपडपट्टी दिसू नये म्हणून उभी राहतीये भिंत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या