Top News

“यूट्यूब चॅनेलवाले काड्या करतात, यांनीच मला संपवण्याचा प्रयत्न केला”

अहमदनगर | प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे टीका केल्याचे व्हिडीओ युट्युबवर व्हायरल होत असतात. त्यांच्या एका व्हिडीओमुळे ते वादाच्या घेऱ्यात अडकले आहेत. या सगळ्या वादावर भाष्य करताना त्यांनी यूट्यूबवर निशाणा साधलाय. शुक्रवारी रात्री झालेल्या किर्तनात ते बोलत होते.

यूट्यूबवाले काड्या करतात. यूट्यूब चॅनलवाल्यांनीच मला संपवण्याचा प्रयत्न केला. मी कोणत्या मुद्द्यावरुन सापडत नाही म्हणून मला अडकवण्याचे प्रयत्न करत आहेत. एक सांगतो चॅनल संपतील पण मी नाही, असं इंदुरीकर म्हणाले आहेत.

एवढाच जर आपल्यासारख्याला त्रास होत असेल, साधा त्रास.. काड्या करणारी मंडळी ही यूट्यूबवाली मंडळी. यांनीच इंदुरीकराला संपवावं..त्यांना माहीत नाही, यूट्यूब संपेल. यूट्यूबवाल्यांना इंदुरीकराच्या नावाने पैसा मिळाला मोक्कार. मी काय या यूट्यूबचा एक रुपयाही घेतला नाही. ही यूट्यूबवाली मंडळी झाली कोट्याधीश. एक एक लाख लाईक आहेत. पैसाच मोजता येईना, इतका पैसा झालाय. पाहाणाऱ्यांची संख्या खूप आहे, असंही इंदुरीकरांनी सांगितलं.

दरम्यान, सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज चांगलेचं अडचणीत सापडले आहेत. या सर्व परिस्थितीवर काल रात्री एका किर्तनात इंदुरीकरांनी भाष्य केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

महापरीक्षा पोर्टलसंदर्भात महाविकास आघाडी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

महत्वाच्या बातम्या-

कोणाची रात्र सजवून मी अभिनेत्री झाले नाही- तनुश्री दत्ता

आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं किर्तन सोडून शेती करणार- इंदुरीकर

“सत्तेसाठी भुकेल्या शरद पवारांनी उसनं अवसान आणू नये”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या