Top News

कीर्तन-प्रवचन सोडणार?; अखेर इंदुरीकर महाराजांनी घेतला मोठा निर्णय

Loading...

परभणी | वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर चांगलेच चर्चेत आले आहेत. तीन दिवसात अर्धा किलोने कमी झालो हो या वादाने मला त्रास होतोय. एक दोन दिवस बघेन अन् कीर्तन सोडून शेती करेन, अशी प्रतिक्रिया इंदुरीकर महाराजांनी दिली आहे.

लोकांच्या चुका शोधणाऱ्या मीडियाला न जुमानता हाती घेतलेल्या समाजप्रबोधनाचा वसा मी कोणत्याही स्थितीत सोडणार नाही, असं इंदुरीकर महाराज यांनी सांगितलं आहे.

एका बाजूला मीडिया तर दुसऱ्या बाजूला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीने महाराजांच्या विरोधात रान पेटवलं आहे. यावर आता इंदुरीकर महाराज यांनी मी कीर्तनाचा वसा सोडणार नाही, असं ठासून सांगितल आहे.

2 तासांच्या भाषणात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. पण मी जे बोललो ते चुकीचं नाहीच. मी बोललो ते अनेक ग्रंथांमध्ये नमूद केलेलं आहे. यूट्यूबवाले काड्या करतात. यूट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण सांगतो चॅनल संपतील पण मी नाही, असं इंदुरीकर म्हणाले.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

इंदुरीकर महाराजांना पाठिंबा देणारा ‘हा’ स्टेटस व्हिडिओ तुफान व्हायरल

इंदुरीकरांसह त्यांच्या समर्थकांवर कारवाई करा; तृप्ती देसाईंनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

महत्वाच्या बातम्या- 

“अंधारात कारस्थानाने शपथ घेणारे फडणवीस सत्तेच्या हव्यासापोटी आंधळे झालेत”

व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांनी केली मोदींवर टीका

…तर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची माफी मागावी- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या