पुणे महाराष्ट्र

इंदुरीकर महाराजांना ‘बाऊन्सर’ची सुरक्षा; वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

Loading...

अहमदनगर | सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होता आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ह.भ.प. इंदुरीकर महाराज देशमुख यांचे नगर येथे कीर्तन पार पडले. मात्र, त्यांना कीर्तन स्थळी पोहोचवण्यासाठी कडेकोड बंदोबस्त करण्यात आला होता.

नगर येथील भिंगार या गावातील शुक्लेश्वर मंदिरात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते. या सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत त्यांना कार्यक्रम स्थळी आणण्यात आले.

Loading...

इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन होणार नाही, अशी कुजबुज सुरु झाली होती. मात्र,  महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. तसेच कीर्तनादरम्यान शुटींग न करण्याच्या सुचना लोकांना देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून इंदुरीकर महाराज चर्चेचा विषय ठरले आहेत. महाराजांनीही वादावर भाष्य केलं असून हे असंच सुरु राहिल्यास सर्व सोडून शेती करणार असल्याचं म्हटलं आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं किर्तन सोडून शेती करणार- इंदुरीकर

मिसेस फडणवीसांनी गायलं इंग्रजी गाणं; सोशल मीडियावर ट्रोल

महत्वाच्या बातम्या-

Loading...

‘2024च्या आधी पुन्हा पुलवामा हल्ला होईल’; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

गद्दारांना पक्षात स्थान नाही, दोन दिवसांत हकालपट्टी करणार- राज ठाकरे

“यूट्यूब चॅनेलवाले काड्या करतात, यांनीच मला संपवण्याचा प्रयत्न केला”

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या