बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंदोरीकर महाराजांना ‘कोल्हापुरी झटका’!

कोल्हापूर | कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र याला कोल्हापूरातील पुरोगामी संघटनांनी विरोध केला.

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचा कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठातील कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला. इंदोरीकर महाराजांना वेळेत पोहोचणं शक्य नसल्याने कार्यक्रम रद्द केल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. तसेच तीन महिन्यानंतर पुुन्हा विद्यापीठच्या बाहेर कार्यक्रम घेणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे.

इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा पुरोगामी संघटनांनी दिला होता. स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांचा कार्यक्रम विद्यापीठात नको, अशी भूमिका अंनिस आणि पुरोगामी संघटनांनी घेतली होती. तर दुसरीकडे कार्यक्रम घेणारच अशी भूमिका कोल्हापूर युवा सेनेनं घेतली.

दरम्यान, अखेर कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मात्र कोणत्याही संघटनेच्या दबावाला बळी पडलो नसल्याचं आयोजकांनी सांगितलंय.

ट्रेंडिंग बातम्या- 

इतिहासात एकाही हिंदू राजाने मस्जिद तोडली नाही- नितीन गडकरी

देशात जे काही होत आहे त्याला आपणच जबाबदार- मोहन भागवत

महत्वाच्या बातम्या- 

…म्हणून 19 जिल्हे वगळून शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर होणार!

एनपीआर आणि एनआरसी महाराष्ट्रात नको- नवाब मलिक

कन्हैया कुमारला राष्ट्रगीताचा विसर; शेवटच्या दोन ओळीत घातला घोळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More