बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही’, इंदुरीकर महाराजांचं मोठं विधान

अहमदनगर | देशात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्यातच प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कोरोना लसीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ माजली आहे. गोपाळरावजी गुळवे यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त घोटी येथे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी प्रत्येक व्यक्तीचे प्रतिकार शक्ती वेगळी आहे, असं म्हणतात मेंदूची देखील क्षमता प्रत्येक व्यक्तीची वेगळी आहे, असं बोलून दाखवलं आहे. कोरोनावर मन खंबीर ठेवणे हे एकच औषध असल्याचं इंदुरीकर महाराजांनी सांगत मी सगळीकडे फिरतो, पण मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही, असं वक्तव्य केलं आहे.

काही होतच नाही तर लस कशाला घ्यायची?, असं यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले तसेच सर्वांनी मन खंबीर ठेवणे गरजेचं असल्याचंही त्यांनी उल्लेख केला आहे. त्यामुळे सध्या परिसरात इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, इंदुरीकर महाराज यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे यापूर्वी त्यांच्यावर ती गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता कोरोना लसीबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

थोडक्यात बातम्या

फेसबुक कंपनीचा पुन्हा एक मोठा निर्णय, ‘ही’ महत्त्वाची सुविधा होणार बंद 

धक्कादायक! बुलडाण्यातील मृत महिलेला तामिळनाडूत कोरोनाची लस

देगलूर-बिलोलीच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांना थेट सोनिया गांधी आणि शरद पवारांचा फोन

ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना दिलासा; इंधन दरवाढीला ब्रेक!

“चौकशीला सामोरं गेलं नाही तर मात्र अटक करायचं, तरी महाविकास आघाडी सरकार मजबूत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More