अहमदनगर | आपलं गाव, आपलं शहर, आपला देश कोरोनापासून मुक्त करायचा असेल तर हे कुणा एकट्याचे आणि प्रशासनाचं काम नसून सर्वांचा लढा आहे, असं वक्तव्य हभप इंदोरीकर महाराज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलं आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोरोना संदर्भातल्या आवाहानाला सर्वांनी सहकार्य करा, असंही इंदोरीकर महाराज यांनी सांगितलं आहे .
प्रत्येकाने आपण आपले कुटुंब कोरोना विषाणूपासून दूर ठेवा. घराबाहेर पडू नका, प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या, असं इंदोरीकर महाराज म्हणाले आहेत.
मी पण घरी आहे तुम्ही पण बाहेर पडू नका, असे इंदोरीकर महाराज यांनी म्हटलं आहे. इंदुरकर महाराज यांनी दिनांक 31 मार्चपर्यंत सर्व कीर्तनाचे कार्यक्रम रद्द केलेले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
धक्कादायक! इटलीत 24 तासांत 627 जणांचा मृत्यू
“…तर कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही”
महत्वाच्या बातम्या-
“टाळ्या वाजवून काही होणार नाही, टॅक्स ब्रेक आणि कर्जफेडीला स्थगिती द्या”
मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही थुंकोबांना भरावा लागणार भुर्दंड; महापौरांनी घेतला निर्णय
विनंती करतोय, घरीच थांबा नाहीतर…- तुकाराम मुंढे
Comments are closed.