अहमदनगर | वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर चांगलेच चर्चेत आले आहेत. इंदुरीकर महाराजांवर एकीकडे टीका केली जात आहे तर दुसरीकडे त्यांचे चाहते त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यांवर उतरले आहेत. यावरून मोर्चा, आंदोलनं करु नका, असं आवाहन इंदुरीकर महाराजांनी चाहत्यांना केलं आहे.
इंदुरीकर महाराजांनी पत्र लिहून चाहत्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. वारकरी सांप्रदाय हा शांतताप्रिय आहे. आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महाराजांनी पत्र लिहिलं आहे.
कोणतीही रॅली, मोर्चे तसंच आंदोलन करू नका, असं आवाहन त्यांनी पत्राच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना केलं आहे.
दरम्यान, आपण आपली बाजू शांततेत आणि कायदेशीररित्या मांडणार आहोत. भक्तांनी कृपया शांतता राखावी, सोशल मीडियामधून कोणत्याही प्रकारची बाजू मांडू नये, असंही त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
केंद्राने पैसे थकवल्यामुळेच राज्यापुढे अर्थिक अडचणी- सुप्रिया सुळे
आर. आर. आबा आणखी 20 वर्ष राजकारणात पाहिजे होते- इंदुरीकर महाराज
महत्वाच्या बातम्या-
“मोदी मोठे ‘विकासपुरुष’, त्यांच्या आधी कोणीच एवढा विकास केला नाही, नंतरही कोण करणार नाही”
छत्रपती संभाजी राजेंकडून श्रीरंग बारणेंचं तोंडभरून कौतुक; म्हणाले…
सुशिक्षित, संपन्न कुटुंबांत घटस्फोट जास्त होतात- मोहन भागवत
Comments are closed.