अहमदनगर | अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर हे गेल्या काही दिवसात चांगलेच चर्चेत आहेत. ओझरमधील किर्तनातील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यावरुन ते चांगलेच गोत्यात आले आहेत. त्यांचा आता शिक्षकांची खिल्ली उडवल्याचा व्हिडीओ व्हारयल होतोय.
शिक्षक वर्गात वेळ कसा वाया घालवतात? याबाबत बोलताना शिक्षकांची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीका केल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आहे. त्यांच्या या टीकेवर शिक्षक संघटना चांगलीच संतापली आहे.
शिक्षकांची नोकरी कशी आरामदायी आहे हे इंदुरीकर महाराज सांगू पाहात आहेत मात्र त्यांनी ते स्वतः शिक्षक आहेत हे विसरु नये, असं काही शिक्षकांनी सुचवलं आहे. स्वतः शिक्षक असल्याने त्यांनी शिक्षकांची प्रतिमा मलीन करु नये, असंही काही शिक्षकांनी सुचवलं आहे.
शिक्षकांची खिल्ली उडवून त्यांच्यावर टीका करणे अनाठायी आहे असे मत अॅक्टिव्ह टीचर्स फोरम, महाराष्ट्र संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केलं आहे. तर शिक्षकांवर अशा प्रकारे भाष्य करण्यापेक्षा इंदुरीकर महाराजांनी समाज प्रबोधनाकडे लक्ष द्यावं अशी प्रतिक्रिया भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरणारे यांनी दिली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“अशोक चव्हाण यांचा प्रामाणिकपणा भावला अन् लग्नाचा निर्णय घेतला”
पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीची आरएसएस संदर्भातील कार्यशाळा अखेर रद्द
महत्वाच्या बातम्या-
राज्य सरकारच्या आदेशानंतर अरविंद सावंत पुन्हा दिल्लीला जाणार!
‘मेरे सपनो की राणी कब आयेगी तू’; व्हॅलेंटाईन डेला अशोक चव्हाणांचं प्रेमगीत
…तिथं कार्यकर्त्यांसोबत बसलो तर बायको हाकलून देईन-अजित पवार
Comments are closed.