बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोहितने इंग्लंडच्या गोलंदाजांचा काढला घामटा, अँडरसनच्या अफलातून चेंडूने शतकापासून ठेवलं दूर; पाहा व्हिडीओ

मुंबई | भारत आणि इंग्लड यांच्यात दुसऱ्या कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरू आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे वाया गेल्यामुळे दुसऱ्या सामन्यात इंग्लडने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. रोहित शर्मा आणि केएल राहूल या सलामीवीर जोडीने दमदार सुरूवात करत भारताला शंभरी पार करून दिली. मात्र अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने रोहितची विकेट घेतली.

रोहितने संयमी आणि आक्रमक अशी संमिश्र खेळी केली. रोहितने 1 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 83 धावा ठोकल्या. इंग्लंडचा युवा गोलंदाज सॅॅम करनवर निशाण्यावर धरलं. रोहितने करनला अवघ्या 10 चेंडूंमध्ये 22 धावा कुटल्या. रोहित शतक ठोकणार असं वाटत होतं कारण त्याने इंग्लंडच्या तिन्ही गोलंदाजांचा घाम काढला होता. मात्र सर्वात यशस्वी गोलंदाज जेम्स अँडरसनने रोहितला बाद केलं.

सामन्यातील 44 व्या षटकात चौथ्या चेंडूवर रोहितला बोल्ड केलं आणि भारताची पहिला गडी गमावला. भारताची पहिली विकेट ही 126 धावांवर पडली. त्यानंतर चेतेश्वर पुजारा फंलदाजीसाठी आला. मात्र त्याला दुसऱ्या सामन्यातही फारशी चमक दाखवता आली आहे. तो 9 धावा काढूनच बाद झाला.

राहुल आपल्या कसोटी करिअर मधील 6 वं शतक पुर्ण केलं आहे. 102 धावांवर राहुल नाबाद आहे तर विराट कोहलीने राहुलला चांगली साथ देत 38 धावांवर खेळत आहे. या दोघांनी दमदार फलंदाजी करत 97 धावांची भागीदारी केली आहे.

दरम्यान, लॉड्सवर पावसामुळे टॉसला उशिरा झाला होता. इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटी सामन्यामध्ये दोन्ही संघाना दुखापतींचा झटका बसला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटीमध्ये दोन्ही संघाने अंतिम 11 खेळाडूंनमध्ये बदल केले आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! संजय राठोडांनी शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोस्टाने पोलिसात तक्रार

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

हॅलो, मी शरद पवार बोलतोय! ‘त्या’ नकली फोन कॉलमुळे मंत्रालयात खळबळ

देशात आणीबाणीसारखी परिस्थिती- खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचा मुद्दा मोठा झाला- राज ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More