पावसामुळे तळ्यात-मळ्यात राहिलेली कसोटी अखेर अनिर्णित

कोलकाता | पहिल्या दिवसापासूनच पावसाच्या व्यत्ययामुळे तळ्यात-मळ्यात राहिलेली कोलकाता कसोटी अखेर अनिर्णित राहिली. पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. 

तत्पूर्वी पहिल्या डावात ढेपाळलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात मात्र दमदार कामगिरी केली. कर्णधार विराट कोहलीने शतक पूर्ण करत भारताला चांगली धावसंख्या गाठून दिली. 

दरम्यान, 231 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. 7 बाद 75 अशी दयनीय अवस्था असताना अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला त्यामुळे श्रीलंकेला पराभव टाळता आला.