आयफोनला विसरा! 108MP कॅमेरा असलेला भन्नाट फोन लाँच; किंमत फक्त…

Infinix Zero 40 5G l स्मार्टफोन उत्पादक कंपनी Infinix Mobiles ने नुकताच आपला नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. Infinix कंपनीने Zero 40 5G लॉन्च केला आहे. या फोनमध्ये कंपनीने 12 GB रॅमसोबत 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा दिला आहे. या फोनची रचना खूपच आकर्षक आहे. तर आज आपण या फोनबद्दलचे सविस्तर फीचर्स जाणून घेणार आहोत…

फीचर्स काय आहेत? :

Infinix च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.78 इंचाचा 3D वक्र AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 144 Hz च्या रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करत आहे. याशिवाय, या फोनमध्ये 12GB रॅमसह 256GB स्टोरेज देखील देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन MediaTek डायमेंशन 8200 चिपसेट प्रोसेसरने सुसज्ज आहे.

Infinix Zero 40 5G मध्ये 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा सेन्सरही आहे. हा नवीन स्मार्टफोन Android 14 वर आधारित XOS ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनमध्ये 5000 mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 45W फास्ट चार्जिंग आणि 20W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Infinix Zero 40 5G l स्मार्टफोनची किंमत किती असणार? :

Infinix कंपनीचा Zero 40 5G स्मार्टफोन हा फोटो प्रेमींसाठी सर्वात बेस्ट फोन आहे. कारण या फोनमध्ये सर्वात बेस्ट फिचर हे कॅमेरा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या स्मार्टफोनची किंमत काय असणार तर या फोनची भारतीय चलनानुसार किंमत 32,794 रुपये असणार आहे.

कंपनीने Infinix Zero 40 5G हा स्मार्टफोन एकाच प्रकारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन व्हायलेट गार्डन, मूव्हिंग टायटॅनियम आणि रॉक ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये खरेदी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे.

News Title – Infinix Zero 40 5G Smartphone Launched

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबईतली म्हाडाची घर तब्बल ‘इतक्या’ लाखांनी कमी होणार; फडणवीसांनी केली घोषणा

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यात वाद, विकी म्हणाला, तिने मला…

त्या माय-लेकींनी टवाळखोरांना असं काही धुतलं की पुन्हा आयुष्यात …

“..पेक्षा सत्तेतून बाहेर पडलेलं बरं”; अजित पवारांच्या जवळच्या नेत्याचं विधान, नेमकं काय घडलं?

“राष्ट्रवादीसोबत असल्याने उलट्या होतात, मला अ‍ॅलर्जी.. “; शिंदे गटाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य